आम्ही काय करतो
प्रत्यक्ष सेवा, प्रत्यक्षात बदल. जिथे गरज तिथे आम्ही.
नूतन विशेष घडामोडी

आधारश्रम नाशिक: अनाथालयास मदत
"नाशिक येथील प्रसिद्ध आधारश्रम अनाथालयाला फाउंडेशनतर्फे महत्त्वाची देणगी देऊन मदत करण्यात आली."

विठ्ठल रुक्माई मंदिर जिर्णोद्धार
"कुऱ्हे पानाचे (भुसावळ) येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या सुशोभीकरणासाठी फरशी, रंगकाम आणि साहित्याची मदत."

शाळेला दर्जेदार खुर्च्यांची भेट
"संत तुकाराम महाराज शाळेला खुर्च्यांचे वाटप."

जव्हार: सायकली, शिलाई मशिन व क्रीडा साहित्याचे मोठे वाटप
"अनाथ मुली व अपंगांना सायकली, महिलांना शिलाई मशिन, चादर, चटई व क्रीडा साहित्य वाटप."

जव्हार: सायकली व कपडे वाटप
"६०+ दिव्यांग व गरजू विद्यार्थ्यांना सायकली आणि कपड्यांचे वाटप."

शाळेला संगणक संच भेट
"संत तुकाराम शाळेला संगणक, प्रिंटर आणि तांत्रिक साहित्याचे वाटप."

वर्धापन दिन भेट: कृत्रिम हात वाटप
"गरजू व्यक्तीला कृत्रिम हात बसवून देण्यात आला."

गरजवंताला कृत्रिम पाय बसवून दिला
"एका अपंग बांधवाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कृत्रिम पाय बसवून देण्यात आला."

नवोदय केंद्र: ५० खुर्च्यांची मदत
"व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांच्या सोयीसाठी ५० खुर्च्यांचे वाटप."

नवजीवन वृद्धाश्रम: किराणा मदत
"नाशिक येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी किराणा व इतर साहित्याचे वाटप."

मंगलरूप गोशाळा: ₹१,११,००० देणगी
"गोशाळेला १ लाख ११ हजार रुपयांची देणगी व आजारी गोवंशासाठी औषध मदत."

मेंदूच्या गाठीच्या उपचारासाठी १ लाखाची मदत
"कुणाल देवरे यांच्या शस्त्रक्रियेसाठी फाउंडेशनने तातडीने मदत केली. कावेरी देवरे यांनी पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली."

मांजरगाव: आदिवासी वस्तीला जलकुंभ
"इगतपुरी येथील आदिवासी वस्तीतील १२ कुटुंबांना ५००० लिटरचा जलकुंभ भेट."

तळवाडे ग्रामपंचायत: व्यायाम साहित्य
"तळवाडे (त्र्यंबकेश्वर) येथील व्यायाम शाळेसाठी साहित्याचा पुरवठा."

नाशिक मनपाला कोरोना साहाय्य
"नाशिक महानगरपालिकेच्या वडनेर केंद्राला अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा."

जनता विद्यालय डुबेरे: शैक्षणिक मदत
"डुबेरे येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप."

मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलला मदत
"त्र्यंबकेश्वर येथील हॉस्पिटलला फाउंडेशनतर्फे ₹५१,००० ची देणगी देऊन सहकार्य केले."

नवोदय केंद्राला दरमहा किराणा मदत
"१२ सप्टेंबर २०२१ पासून दरमहा ₹१५,०००+ चा किराणा पुरवठा."

जनता विद्यालय डुबेरे: वह्या वाटप
"सिन्नर येथील शाळेतील गरजूंना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप."