आदित्यम्
संस्थापकाचा दृष्टिकोन

आदित्यम्: एक किरण आशेचा

"दानाला फक्त अर्थ नसतो तर परमार्थ देखील असतो."

मूळ कथा

एका सामान्य कुटुंबातून जागतिक व्यापारापर्यंत

डॉ. किरण बडगुजर यांचा प्रवास एका साध्या घरातील लहान मुलापासून सुरू झाला.

प्रत्येक पाऊल हे संघर्षाचं होतं, पण आई-वडिलांचे संस्कार आणि आशीर्वादाने त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आज त्यांचा व्यापार युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचला असला, तरी त्यांचे पाय आजही आपल्या मातीत आणि लोकांसाठी झटणाऱ्या मनगटात आहेत.

Dr. Kiran Badgujar
अहम उपक्रम

जिथे गरज, तिथे आम्ही

बळीराजासाठी आधार

शेतकऱ्यांच्या व्यथा समजून त्यांना मोफत बियाणे, खते आणि जनावरांसाठी आवश्यक औषधे 'मॅक ऑरा' तर्फे विनामूल्य पुरवली जातात.

व्यसनमुक्ती केंद्र

नाबार्ड सारख्या केंद्रांना २ वर्षे रेशन, RO सिस्टीम आणि बायोगॅस देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे कार्य फाउंडेशन करते.

औद्योगिक आत्मनिर्भरता

फाउंडेशनला इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये यासाठी उद्योगातील नफ्याचा मोठा वाटा थेट समाजकार्यात विनियोग केला जातो.

Adityam
संस्थापकाचा संदेश

"आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही, पण प्रत्येकजण कुणालातरी मदत नक्की करू शकतो."

Dr. Kiran Badgujar